सुट्टी बुडाली,
अमोल चुकचुकला.
अंजलीनं यादीत,
अष्ट्गंध लिहीला.
पडेलकर थर्माकोल आणायला गेलेत.
उस्मान शेटनं सोसायटीचा मंड्प पुरा केलाय.
मायकल बेंजोवर ओमकाराचा रियाझ करतोय.
पारशी डेरीत पेढ्यांची ऑर्डर वाढली.
जिग्नेशनं लोहार चाळीतून चायनीज लाइटची माळ आणली.
रॉय साहेबांनी दिलाय, सतर्कतेचा इशारा,
गुरखा चक्क रात्री जागाच राहीला.
वाजनार टाळ, होणार आर्ती,
येणार येणार उत्सव मूर्ती
सज्ज व्हा गणरायाच्या स्वागताला.
गणपती बाप्पा मोरया!!!!!!!!
ganapati
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment