::::::::::::आठवण:::::::::::::

आठवण येते कधी मला...
अन गालावर खुद्कन खळी पाडते...
तर कधी हसता-हसता....
डोळी माझ्या पाणी आणते.....

गर्दीत राहुन सुद्धा ती....
एकांताच आभास देते.....
अन एकांतात गेलो तरी मला....
नाही कधी एकटे सोडते....

डोळे बंद केल्यावरचे.....
नवे विश्व दाखवुन देते....
अन उघड्या डोळ्यांनाही .....
ती कधी धुंद करुन टाकते.....

दूर लोटायचा प्रयत्न केला....
तर अधिकच जवळ येवुन बसते....
जवळ तिला बोलवले तर मात्र....
कोपरयात कुठे दडुन बसते.....

हिच आहे माझी खरी मैत्रिण....
नेहमी साथ देणारी.....
आगंतुक असली तरी.....
हवी-हवीशी वाटणारी....

शोधू कूठे तुला मी

नेहमीसारखेच काही हे दिवस
जातात जणू
तेच ते नेहमीचे जगणे तेच ते
एकटे श्वास
कधी-कधी मला वाटते जर हे
जगणे नेहमीसारखे नसते तर..
तिथे जर तुझी साथ असती तर...
कधी मी एकटा नसतो तर...

तुझ्या विचारात हरवलेलो
असतो मी
भर गर्दित सुद्धा एकलकोंडा
झालेला असतो मी
ह्या हरवलेल्या वाटेत
सावल्यांच्या खेळात फसलो मी
बोल ना ग सखे शोधू कुठे तूला मी

बागेपाशी उभा असतो
फुलपाखरांना पाहत असतो
ती फुलपाखरे एकटी नसतात
त्यांच्या बरोबर निसर्ग असतो
माझ्या नशीबात तू असतीस तर.....
बागेमध्ये तू असतीस मी असतो
अन निसर्गाच्या छायेखाली
आपण असतो

हळूच हसतेस काळजात ठसतेस
तुझ्या आठवणीत विस्कळून
गेलो मी
तुझ्या आठवणींतच का जणू
जगून मेलो मी
वेडे आता ह्या जीवाला लागली
तुझीच तमा.... सांग मला शोधू
कुठे तूला मी

माझे तुझ्यावर प्रेम आहे हे
बोलायचे होते
अन प्रेमाचे ते बोल बोलायचे
राहूनच गेले
काळ वेळ अन तिला मी आज हरलो
एकटेपणाच्या भोवय्रात मीच
कसा आज फसलो

सावल्यांमध्ये का शोधत
असतो तूला मी
जरा मागे वळून पाहा माझ्याकडे
बघ कसा मिठीत घेतो तुला मी
मनच काय ह्र्दय सुद्धा आज
बोलत आहे शोधू कुठे तूला मी

Marathi message

नेहमीच कसं हसवायचं…??
तूच सांग देवा असं किती दिवस चालायचं…
जोकर बनुन सर्वांना नेहमीच
कसं हसवायचं…??

समोरचा तो हसला………… ….नव्हे!
हसवण्यावर माझ्या फसला!!
त्याच्या समोर रडलोच् तर…
हसवणाराच् मी कसला…

माणसांच्या या गर्दीमध्ये
स्वतःला मात्र विसरायचं…
दू:ख दाबून ओठांमध्ये ,
त्यांतच हसून दाखवायचं
पण …. श्वास जड होतो
जेव्हा—…तेव्हा रे काय करायचं???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच
कसं हसवायचं…!!!

मी रडू लागलो जेव्हा …
ते मात्र हसत होते…
कारण, माझ्या रडण्यामधले
व्यंगच त्यांना दिसत होते…

मनातलं सर्व मनातच ठेवून,
हसून मग मी दाखवायचं,..
शिषीरा नंतर येतो
वसंत…….स्वप्नंच् फक्त पहायचं
पण; ……..ह्रूदयातच ढग दाटून
येतो….तेव्हा रे काय करायचं….???
जोकर बनुन सर्वांना नेहमीच
कसं हसवायचं…!!!

Amazing fact

Do you know,

Letters 'a', 'b', 'c' &'d' do not appear anywhere in the spellings of 1
to 99

( Letter 'd' comes for the first time in Hundred )

Letters 'a', 'b' & 'c' do not appear anywhere in the spellings of 1 to 999

( Letter 'a' comes for the first time in Thousand )

Letters 'b' & 'c' do not appear anywhere in the spellings of 1 to 999,999,999

( Letter 'b' comes for the first time in Billion )

And

Letter 'c' does not appear anywhere in the spellings of entire English counting

आज या जीवनाच्या वळणावर

आज या जीवनाच्या वळणावर
मागे वळून पहावेसे वाटते
ह्या जीवन रूपी पुस्तकाचे
एकूण एक पान वाचावेसे वाटते

कधी मी लहान ही होते
आई बाबांची फारच लाडकी होते
माझे हुट्ट पुरवताना
आई बाबा उपाशी ही झोपले होते

माझी भावंडे फारच लाडकी
मस्ती करण्यात कधीच मागे नाहीत
शिस्तिसाठी हात त्यांवर
उगारला ही
पण कौतुकासाठी आनंदाश्रू
ही आवारले नाहीत

आई बाबांनी मला
फुलाप्रमाणे जपले
कधीही डोळ्यात अश्रू आणू
दिले नाहीत
मला स्वतंत्र करायचे हाच एक ध्यास
परिस्थितीशी झगडताना
अजिबात थकले नाहीत

आवडला ही असेल कोणी मला
पण कधी कोणावर जीव जडला नाही
जे आपल्यासाठी एवढे झटले
त्यांचा विश्वास कधीच
तोडला नाही

एक ना अनेक अशा या आठवणी
आज उचंबळून येत आहेत
डोळ्यात तरारलेले हे अश्रू
मला आवरता येत नाही आहेत

पण ह्या वळणावर
अश्रून्सोबत आहे
हा सूर्योदय, नवीन अशा
पल्लवित करीत आहे
इंद्रधनुष्य, जीवनात नवीन
रंग भरत आहे
हा मंद वारा, काही तरी मनाला
सुचवत आहे

दुख मला असेलच कुठेतरी ह्या वळणावर
त्या सर्वाना सोडून जाताना
पण आनंद ही असेलच
जीवनी माझा जीवनसाठी सोबत असताना

आज माझ्या अश्रूंची वाट
त्याने अडवली
हृदयात जणू त्याने मला
सामावून घेतले
त्याच्या एका प्रेमाच्या स्पर्शाने
जणू माझे सारे जीवन बहरले

वाटले आता खरा प्रवास सुरू
झाला आहे
असें मी लहान..पण आता
स्त्री-त्वाची जाण होत आहे
माझ्या अश्रूंची व्याख्या
मला कधी कललीच नाही
पण ओठांवरच्या या
हास्याचे....रहस्य मात्र आज
उमगले आहे....!!!!

Sami has invited you to join Picsquare

 

join this and get great benefits on photo prints



Sami Azmi (samiazmi@gmail.com) has invited you to open a free Picsquare account. To accept this invitation and register for your account, please click here.

Picsquare allows you to upload, organize, view, share and order prints of your digital photographs online. It also provides you with a convenient way to create your own personalized photo gifts, get it printed and delivered to your loved ones.

Some of the major features include:
  1. Buy digital prints as low as 9 cents / Rs. 3.00
  2. Use unlimited storage capacity for uploading photographs.
  3. Organize your photographs using Tags and share them online.
  4. Create Personalized Photo Greetings starting at Rs. 49 / $1.39.
  5. Buy personalized Photo Calendar as low as $10.99 / Rs. 399.
  6. Buy personalized Photo T-shirts as low as $10.99 / Rs. 399.
  7. Buy personalized Photo Mug as low as $7.99 / Rs. 299.
To learn more about Picsquare, visit Picsquare.
(If clicking the URLs in this message does not work, copy and paste them into the address bar of your browser).

Thanks,
Picsquare Team
www.picsquare.com