आज या जीवनाच्या वळणावर
मागे वळून पहावेसे वाटते
ह्या जीवन रूपी पुस्तकाचे
एकूण एक पान वाचावेसे वाटते
कधी मी लहान ही होते
आई बाबांची फारच लाडकी होते
माझे हुट्ट पुरवताना
आई बाबा उपाशी ही झोपले होते
माझी भावंडे फारच लाडकी
मस्ती करण्यात कधीच मागे नाहीत
शिस्तिसाठी हात त्यांवर
उगारला ही
पण कौतुकासाठी आनंदाश्रू
ही आवारले नाहीत
आई बाबांनी मला
फुलाप्रमाणे जपले
कधीही डोळ्यात अश्रू आणू
दिले नाहीत
मला स्वतंत्र करायचे हाच एक ध्यास
परिस्थितीशी झगडताना
अजिबात थकले नाहीत
आवडला ही असेल कोणी मला
पण कधी कोणावर जीव जडला नाही
जे आपल्यासाठी एवढे झटले
त्यांचा विश्वास कधीच
तोडला नाही
एक ना अनेक अशा या आठवणी
आज उचंबळून येत आहेत
डोळ्यात तरारलेले हे अश्रू
मला आवरता येत नाही आहेत
पण ह्या वळणावर
अश्रून्सोबत आहे
हा सूर्योदय, नवीन अशा
पल्लवित करीत आहे
इंद्रधनुष्य, जीवनात नवीन
रंग भरत आहे
हा मंद वारा, काही तरी मनाला
सुचवत आहे
दुख मला असेलच कुठेतरी ह्या वळणावर
त्या सर्वाना सोडून जाताना
पण आनंद ही असेलच
जीवनी माझा जीवनसाठी सोबत असताना
आज माझ्या अश्रूंची वाट
त्याने अडवली
हृदयात जणू त्याने मला
सामावून घेतले
त्याच्या एका प्रेमाच्या स्पर्शाने
जणू माझे सारे जीवन बहरले
वाटले आता खरा प्रवास सुरू
झाला आहे
असें मी लहान..पण आता
स्त्री-त्वाची जाण होत आहे
माझ्या अश्रूंची व्याख्या
मला कधी कललीच नाही
पण ओठांवरच्या या
हास्याचे....रहस्य मात्र आज
उमगले आहे....!!!!
मागे वळून पहावेसे वाटते
ह्या जीवन रूपी पुस्तकाचे
एकूण एक पान वाचावेसे वाटते
कधी मी लहान ही होते
आई बाबांची फारच लाडकी होते
माझे हुट्ट पुरवताना
आई बाबा उपाशी ही झोपले होते
माझी भावंडे फारच लाडकी
मस्ती करण्यात कधीच मागे नाहीत
शिस्तिसाठी हात त्यांवर
उगारला ही
पण कौतुकासाठी आनंदाश्रू
ही आवारले नाहीत
आई बाबांनी मला
फुलाप्रमाणे जपले
कधीही डोळ्यात अश्रू आणू
दिले नाहीत
मला स्वतंत्र करायचे हाच एक ध्यास
परिस्थितीशी झगडताना
अजिबात थकले नाहीत
आवडला ही असेल कोणी मला
पण कधी कोणावर जीव जडला नाही
जे आपल्यासाठी एवढे झटले
त्यांचा विश्वास कधीच
तोडला नाही
एक ना अनेक अशा या आठवणी
आज उचंबळून येत आहेत
डोळ्यात तरारलेले हे अश्रू
मला आवरता येत नाही आहेत
पण ह्या वळणावर
अश्रून्सोबत आहे
हा सूर्योदय, नवीन अशा
पल्लवित करीत आहे
इंद्रधनुष्य, जीवनात नवीन
रंग भरत आहे
हा मंद वारा, काही तरी मनाला
सुचवत आहे
दुख मला असेलच कुठेतरी ह्या वळणावर
त्या सर्वाना सोडून जाताना
पण आनंद ही असेलच
जीवनी माझा जीवनसाठी सोबत असताना
आज माझ्या अश्रूंची वाट
त्याने अडवली
हृदयात जणू त्याने मला
सामावून घेतले
त्याच्या एका प्रेमाच्या स्पर्शाने
जणू माझे सारे जीवन बहरले
वाटले आता खरा प्रवास सुरू
झाला आहे
असें मी लहान..पण आता
स्त्री-त्वाची जाण होत आहे
माझ्या अश्रूंची व्याख्या
मला कधी कललीच नाही
पण ओठांवरच्या या
हास्याचे....रहस्य मात्र आज
उमगले आहे....!!!!
No comments:
Post a Comment